Maharashtra Police : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: महाराष्ट्र पोलिस दलात 15,631 पदांची मेगा भरती; शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.