France : फ्रान्ससह पाच देशांनी पॅलेस्टाईनला दिली मान्यता; मॅक्रॉन म्हणाले – हा हमासचा पराभव
फ्रान्स, मोनाको, माल्टा, लक्झेंबर्ग आणि बेल्जियम यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांच्या बैठकीत सोमवारी रात्री उशिरा ही अधिकृत घोषणा करण्यात आली.