Raj Thackeray : राज ठाकरेंचा 96 लाख बोगस मतदारांचा आकडा खोटा, भाजपचा पलटवार; संभाव्य पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचा आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवण्यासंबंधी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतील संभाव्य पराभवाच्या भीतीने 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडा ठोकून दिला. हा आकडा कुठून आणला हे त्यांनाही माहिती नाही, असे भाजपने म्हटले आहे.