CM Fadnavis : सीएम फडणवीसांनी केली पडळकरांची कानउघाडणी, म्हणाले- आक्रमकपणा दाखवताना भान राखण्याची गरज
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असे ते म्हणालेत.