India GDP Growth : भारताची GDP वाढ 7.4% राहण्याचा अंदाज; आर्थिक वर्ष 2025-26 साठी पहिला आगाऊ अंदाज जारी
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) आर्थिक वर्ष 2025-26 साठी देशाच्या आर्थिक वाढीचा पहिला आगाऊ अंदाज जारी केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची वास्तविक जीडीपी वाढ 7.4% राहण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सरकारचा अंदाज 6.3%–6.8% होता.