Indore High Court : मध्यप्रदेशातील 75 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा होणार; इंदूर हायकोर्टाचा NTA ला आदेश
इंदूरमधील ७५ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा घेतली जाणार आहे. इंदूर उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) पुन्हा परीक्षा घेण्याचे आणि निकाल लवकरच जाहीर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याचा रँक केवळ पुनर्परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विचारात घेतला जाईल.