Anil Ambani बँक ऑफ बडोदाकडून अनिल अंबानी, आरकॉम कंपनी फ्रॉड घोषित; तिसऱ्या बँकेची कारवाई
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोद्यानेही दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि त्याचे माजी संचालक अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले आहे. आरकॉमने सांगितले की, त्यांना २ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदाकडून पत्र मिळाले, ज्यामध्ये कंपनी व अंबानी यांचे कर्ज खाते ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला १,६०० कोटी रुपये व ८६२.५० कोटींची कर्जमर्यादा दिली होती. २८ ऑगस्टच्या स्थितीनुसार एकूण २,४६२.५० कोटींपैकी ₹१,६५६.०७ कोटी रुपये अजून थकीत आहेत. हे खाते ५ जून २०१७ पासून एनपीए म्हणून घोषित आहे. बँकेचे म्हणणे आहे की हा निर्णय फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टवर आधारित असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आहे.