RBI Issues : RBI ची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस; गैरकारभाराचा ठपका, आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 ‘अ’ आणि 47 ‘अ’ अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या नोटीसमुळे सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.