RBI Governor Sanjay Malhotra : भारताची अर्थव्यवस्था जागतिक विकासाचा कणा, ‘डेड इकॉनॉमी’ टिप्पणीवर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा ट्रम्प यांना चोख प्रतिवाद
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला “डेड इकॉनॉमी” म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, जागतिक विकासात भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक आहे.