Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा
पुणे येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांना देखील ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून पोलिसांनी खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.