Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राज्यातील 10 जिल्ह्यांत उमेद मॉल, महिलांसाठी गोंदिया, रत्नागिरी-वाशीम येथे विशेष न्यायालयाची स्थापना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.