जनसामान्यांच्या सहभागाच्या माध्यमातून परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ; ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन!!
हिंदू समाजातील दोषांवर परिपूर्ण उपाय म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ जरी मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या सहभागाच्या माध्यमातून घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ होय,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.