Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भारताच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, दुसरीकडे आता काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्याचं समोर आलं आहे.