Rapido Driver : रॅपिडो चालकाच्या खात्यात ₹331 कोटी; ताज अरावली रिसॉर्टमधील लग्नाशी गुजरात युवक काँग्रेस नेत्याचा संबंध; 17 वेगवेगळ्या पॅन क्रमांकांचा वापर
उदयपूरच्या शाही विवाह सोहळ्यातील ईडीच्या तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. यापूर्वी एजन्सीने एका रॅपिडो चालकाच्या बँक खात्यातून ३३१ कोटी रुपयांचे व्यवहार शोधले होते आणि आता या प्रकरणात गुजरात युवक काँग्रेसचे नेते आदित्य जुला यांचे नाव समोर आले आहे.