Ranya Rao : रान्या राव सोने तस्करी प्रकरणात ‘ED’ची मोठी कारवाई
रान्या राव सोने तस्करी प्रकरणासंदर्भात, गुरुवारी कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या कथित रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने गुरूवारी बंगळुरू आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावला अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानेही गुन्हा दाखल केला आहे.