द फोकस एक्सप्लेनर : काश्मीर प्रश्नावर भारताची रोखठोक भूमिका; पाकिस्तानने PoK रिकामा करावा, तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नको
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातच द्विपक्षीय पद्धतीने सोडवला जाईल, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही. मंगळवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर (पीओके) रिकामा करावे लागेल. त्यांनी पुनरुच्चार केला की हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.