रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असताना नाशिक मध्ये गंगा गोदावरीला आलेल्या महापुरात रामतीर्थ गोदाकाठी असलेली गोदाकुटी आज पूर्णपणे वाहून गेली. तरीही गोदावरी आरतीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला आहे. त्यानुसार आज सायंकाळी गोदा सेवकांनी गोदावरी महाआरती केली.