सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण; रामतीर्थ गोदावरी सेवा समिती प्रकाशित करणार ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ
२०२६ – २७ मध्ये होणारा नाशिक आणि त्रंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक ऐतिहासिक, सांस्कृतिक उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी महात्म्याचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे.