Goa Speaker Ramesh Tawadkar : गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांचा राजीनामा; मंत्रिमंडळात सामील
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तावडकर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा राजभवन येथे दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी बुधवारी तावडकर आणि कामत यांना मंत्री केले जाईल याची पुष्टी केली.