केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रणित NDA मध्ये सहभागी व्हावे; रामदास आठवलेंची अजब सूचना!!; पण ही कम्युनिस्टांना “गुगली”, की भाजपला “बाउन्सर”??
केरळमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्रातले नेते आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तिरुअनंतपुरम मध्ये जाऊन एक वेगळीच भाजप सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) वेगळीच राजकीय खळबळ माजली. अशी सूचना करून रामदास आठवले यांनी अशी सूचना करून कम्युनिस्टांना “गुगली” टाकली, की भाजपला “बाउन्सर” टाकला??, या विषयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.