Ram temple : सलमानने राम मंदिराचे घड्याळ घातल्याने मौलाना संतापले; म्हणाले- तो शरियतनुसार दोषी, अवैध आणि हराम; पश्चात्ताप करावा!
राम मंदिर एडिशनचे घड्याळ घातल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मौलाना अभिनेता सलमान खानवर संतापले आहेत. बरेलीतील अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले- सलमानने राम मंदिराचे घड्याळ घालणे बेकायदेशीर आणि हराम आहे. तो शरियाचा गुन्हेगार आहे. मुस्लिम असूनही गैर-इस्लामी काम केले. पश्चात्ताप केला पाहिजे.