Ram Navami : रामनवमीला अयोध्येत 2.5 लाख दिवे प्रज्वलित; रामलल्लाचा सूर्य तिलक
रविवारी देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली. देशातील प्रमुख राम मंदिरांमध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिर सुंदरपणे सजवण्यात आले होते आणि रोषणाई देखील करण्यात आली होती. सूर्याच्या किरणांनी भगवान श्रीरामांचा तिलक केला. रात्री लोकांनी शरयू नदीच्या काठावर हजारो दिवे लावले.