Ram Kadam : … तर सुशांतच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळाला असता – राम कदम
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राम कदम म्हणाले की, सर्व पुरावे नष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. हे आपल्या लोकांना वाचवण्यासाठी केले गेले. जर पुरावे नष्ट करण्यापूर्वी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले असते तर सुशांतच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळाला असता.