Rakesh Rathod : काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना भर पत्रकारपरिषदेतून अटक
उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश राठोडवर बलात्काराचा आरोप आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर, पोलिसांनी राकेश राठोड यांना लोहारबाग येथील त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असताना अटक केली