Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर म्हणाले- शरद पवारांची पुढील 6 महिन्यात खासदारकी संपणार, 10 आमदारांवर राज्यसभेत कसे जाणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सध्याची राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील सहा महिन्यांत संपत आहे, परंतु त्यांच्या या सदस्यपदाची चिंता चक्क भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लागून राहिली आहे. पवार कुटुंबावर सातत्याने टीका करणारे पडळकर यांनी, 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असे म्हणत शरद पवार यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य करत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. शरद पवार यांनी 2019 मध्ये राज्यसभेतून खासदारकी स्वीकारली होती.