Rajnath : राजनाथ यांचा पाकिस्तानला इशारा; सरक्रीकमध्ये सैन्याचा हस्तक्षेप वाढल्यास इतिहास-भूगोल बदलू
सरक्रीक प्रदेशात पाकिस्तानच्या लष्करी उभारणीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल असे उत्तर दिले जाईल. संरक्षणमंत्र्यांनी ‘शस्त्रपूजा’निमित्त एका जाहीर कार्यक्रमात हे विधान केले.