Rajnath Singh : ‘भारत जगातील सर्वोच्च लष्करी शक्ती बनेल’, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारत जगातील पहिल्या क्रमांकाची लष्करी शक्ती म्हणून उदयास येईल. यावर्षी देशाचे संरक्षण उत्पादन १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे आणि २०२९ पर्यंत ३ लाख कोटी रुपयांची लष्करी उपकरणे तयार करण्याचे लक्ष्य आहे.