Rajiv Chandrasekhar : राजीव चंद्रशेखर यांची केरळ भाजप अध्यक्षपदी आज होणार निवड
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजीव चंद्रशेखर यांनी केरळ भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी नारायणन नंबूदिरी यांनी निवडणुकीची अधिसूचना जारी केली. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे होती, त्याच दिवशी दुपारी ४ वाजता छाननी होणार होती आणि चंद्रशेखर हे एकमेव उमेदवार होते.