Raje Mudhoji Bhosale : मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण देण्यात यावे, ओबीसीतून नको; राजे मुधोजी भोसले यांची मागणी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला यश आले व महायुती सरकारने आरक्षणाबाबतचा शासन निर्णय घेतला. त्यानुसार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचे सरकारने मान्य केले. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.