Monsoon Session : पावसाळी अधिवेशन: राजदंडाला स्पर्श- नाना पटोले निलंबित; शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून गदारोळ
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यात केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणात लोणीकर, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात राजदंडला देखील स्पर्श केला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी एका दिवसासाठी निलंबित केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोज निलंबित केले तरी सभागृहात आवाज उचलणार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.