Rajasthan : राजस्थानमध्ये बसून अमेरिकन लोकांना फसवल्याप्रकरणी १३ जणांना अटक
राजस्थानमधील झुंझुनू येथून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी १३ तरुण-तरुणींना अटक केली आहे. मायक्रोसॉफ्टशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आरोपींनी इंटरनेट मीडियावर हेल्पलाइन नंबर पोस्ट केले होते.