Ajit Pawar : ‘हंबरडा’ मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना काय केले? अजित पवारांचा सवाल, उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सरकारच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला. वडगाव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.