Railway project : तामिळनाडू-आंध्र प्रदेशात 1332 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; कनेक्टिव्हिटी 14 लाख लोकांपर्यंत वाढेल
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील तिरुपती ते काटपाडी पर्यंतच्या १०४ किमीच्या सिंगल रेल्वे लाईनचे दुहेरी लाईनमध्ये रूपांतर केले जाईल.