Rahul Narwekar : उमेदवारांना धमकावल्याचे आरोप हास्यास्पद; उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न, व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकरांचे भाष्य
कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला.