Uddhav Thackeray : राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली, दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचे निलंबन करा; उद्धव ठाकरेंची मागणी
निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते.