राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.