Rahul Deshpande : लोकप्रिय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट; 17 वर्षांच्या संसारानंतर पत्नी नेहापासून वेगळे
प्रसिद्ध मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी नेहा यांनी 17 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देत घटस्फोट घेतला आहे. राहुल देशपांडेंनी स्वतः सोशली मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. राहुल आणि नेहा यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा कायदेशीर घटस्फोट सप्टेंबर 2024 मध्येच झाला होता. मात्र जवळपास वर्षभर हा विषय खासगी ठेवून, राहुल देशपांडेंनी नुकताच तो सर्वांशी शेअर केला. या बातमीमुळे राहुल देशपांडे यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल आणि नेहा यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.