रघुराम राजन यांच्या बुद्धीभेदाला अमिताभ कांत यांचा उतारा; भारताला चीन बरोबर उत्पादन क्षेत्रात उतरवा!!
केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी Make in India – Make for the World आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचे प्रमोशन करण्यात गुंतले आहे, त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला अनेकदा त्याच्या विपरीत सल्ला दिला. भारत उत्पादन क्षेत्रामध्ये नव्हे, तर सेवा क्षेत्रात आघाडीवर होता. तेच क्षेत्र आपण मजबूत केले पाहिजे. सेवाक्षेत्रा मध्येच जागतिक पातळीवर ठसा उमटवला पाहिजे. त्यातूनच भारताची आर्थिक प्रगती चांगली होऊ शकेल. आर्थिक प्रगतीचा वेग जगाच्या तुलनेत थोडा अधिक राहू शकेल, असा तो सल्ला होता आणि आहे.