Raghav Chadha : संजय सिंह यांची उपराष्ट्रपतींकडे याचिका सादर; राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी
AAP खासदार संजय सिंह यांनी रविवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना याचिका सादर करून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. सिंह म्हणाले की, या सदस्यांनी पक्ष सोडणे हे पक्षांतरबंदी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे.