Rafale Marine : भारत-फ्रान्समध्ये 64 हजार कोटींचा करार; नौदलाला मिळणार 26 राफेल मरीन जेट विमाने
भारतीय समुद्राच्या रक्षणासाठी राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी बहुप्रतीक्षित सुमारे ६४ हजार कोटींचा करार सोमवारी भारत आणि फ्रान्समध्ये झाला. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण करारांतर्गत भारताला २६ राफेल एम लढाऊ विमाने मिळणार आहेत. यामध्ये २२ सिंगल सीटर आणि ४ ट्विन सीटरचा समावेश आहे.