Chandigarh Firm : अण्वस्त्र आणीबाणीच्या तयारीत खाडीतील देश; चंदीगडमधील औषध कंपनीकडे अणुआपत्तीत उपयुक्त ठरणाऱ्या 1 कोटी कॅप्सूलबाबत विचारणा
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाडी देशांनी अण्वस्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बहरीनस्थित एका फार्मा लायझनिंग एजंटने चंदीगडमधील एका औषध कंपनीशी संपर्क साधला आहे. त्याने अण्वस्त्र आणीबाणीत उपयुक्त ठरणाऱ्या प्रुशियन ब्लू कॅप्सूलबाबत चौकशी केली आहे.