Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांनी फेटाळले भुजबळांचे आरोप; आरक्षणाचा GR काढताना कोणताही दबाव नव्हता; भुजबळांचा गैरसमज दूर करणार
मराठा आरक्षणाचा जीआर सरकारने प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने त्यांचा आरोप धुडकावून लावला आहे. मराठा आरक्षणाचा जीआर काढताना सरकारवर कोणताही दबाव नव्हता. आमच्या उपसमितीने अतिशय विचाराअंती 3-4 बैठका घेऊन हा निर्णय घेतला. उपसमिती त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले आहे.