R Ashwin : भारत सरकारने दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनला पद्म पुरस्काराने केले सन्मानित
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकारने ज्या खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार दिला आहे, त्यात नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आर. अश्विनचे नावही समाविष्ट आहे. क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विन निश्चितच या सन्मानास पात्र होता.