राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेकाप ठाकरे बंधूंच्या दारी; संभाजी ब्रिगेडची दोरी पवारांच्या हाती!!
महाराष्ट्रात राजकीय फेरमांडणी व्हावी आणि आपापल्या पक्षांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी दोन मोठ्या राजकीय हालचाली आज घडल्या. राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेतकरी कामगार पक्ष ठाकरे बंधूंच्या दारी गेला, तर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड शरद पवारांना घरी जाऊन भेटून आले. दोन्ही ठिकाणी राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने शेकाप आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी दोन राजकीय घराण्यांचा आश्रय घेतला.