Puri Jagannath Temple : 48 वर्षांनंतर भगवान जगन्नाथाच्या रत्न भंडाराची गणती; रिझर्व्ह बँक करणार निगराणी, 25 मार्चपासून प्रारंभ
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची बहुप्रतीक्षित मोजदाद आणि यादी बनवण्यासाठी प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. ओडिशा सरकारने चैत्र शुक्ल सप्तमीला (25 मार्च, बुधवार) दुपारी 12:12 पासून ते 1:45 पर्यंतचा शुभ मुहूर्त त्यासाठी निश्चित केला आहे. यापूर्वी 1978 मध्ये रत्न भंडारातील आभूषणांची गणती झाली होती. ती तब्बल 72 दिवस चालली होती.