Punjab Police : पंजाब पोलिसांनी 13 महिन्यांनी शंभू-खनौरी सीमा रिकामी केली; बुलडोझरने शेतकऱ्यांचे शेड हटवले, 200 आंदोलक ताब्यात
पंजाब पोलिसांनी १३ महिन्यांपासून बंद असलेल्या हरियाणा-पंजाबच्या शंभू आणि खानौरी सीमा मोकळ्या केल्या आहेत. येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हाटवण्यात आले. यावेळी २०० शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी बांधलेले शेड बुलडोझरने पाडण्यात आले.