Punjab government : दिल्लीत पंजाब सरकारच्या वाहनातून दारू अन् रोख रक्कम जप्त
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, पंजाब भवनाजवळील कोपर्निकस मार्गावर पंजाब नंबर प्लेट असलेली एक गाडी आढळून आली ज्यावर पंजाब सरकार लिहिलेले होते. वाहनाची झडती घेतली असता त्यातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दारूच्या बाटल्या आणि आम आदमी पक्षाचे (आप) निवडणूक पत्रके जप्त करण्यात आली. भाजपने यासाठी आम आदमी पक्षाला जबाबदार धरले आहे.