Punjab Gangster : पंजाबमध्ये गँगवार! गोळीबारात गँगस्टर जग्गूच्या आईसह ASIच्या मुलाचा मृत्यू
पंजाबमधील बटाला येथे गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या आईची गोळीबारात हत्या झाली आहे. शिवाय, पोलिसांच्या एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही गोळीबारामुळे मृत्यू झाला. बटाला येथील काडिया रोडवर अज्ञात लोकांनी एका स्कॉर्पिओवर गोळीबार केला आणि हल्ल्यानंतर ते पळून गेले.