Pune : पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी, हवामान खात्याचा अंदाज
ऐन दिवाळी राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई आणि उपनगरांसह विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांवर पावसाने जोरदार हल्ला चढवला. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.