Pune Youth : पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; भगवे वस्त्र घालून केले कोयत्याने वार, पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.